पेसा ग्राम पंचायत कार्यालय जामन्यापाडा

पेसा ग्राम पंचायत कार्यालय जामन्यापाडा

ता. शिरपूर, जि. धुळे (महाराष्ट्र)

नमुना १

अंदाजपत्रक

कलम ६२ नुसार आर्थिक वर्षाकरिता जमा खर्चाचा अंदाजित अहवाल म्हणजे अंदाजपत्रक होय.

नमुना ३

ग्रामपंचायत जमाखर्चाचे विवरण

ग्रामपंचायत जमाखर्च विवरण तयार करून आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेस सादर करणे आवश्यक आहे. तसेंच वार्षिक जमा खर्चाचे विवरण पत्र ग्रामपंचायत खातेदारांना शासन आदेशाश्रमाणे सरपंच आणि ग्रामसेवक यांचे सहीनिशी देणे, आवश्यक आहे.

नमुना ४

ग्रामपंचायत मत्ता व दायित्वे

ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या थकित रक्कमा (दायित्व) आणि येणे असलेल्या रक्कमा यांचे वर्षाअखेरीस (दि. ३१ मार्च पूर्वी) विवरणपत्र तयार केले पाहिजे. आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेसमोर सरपंच यांनी ते सादर करावे. सदरचे विवरणपत्र दि. १ जून पूर्वी पंचायत समितीस सादर करणे बंधनकारक आहे.

नमुना ७

सामान्य पावती

ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या विशेष उत्पन्नासाठी नमुना ७ पावती दिली जाते व ती सरपंचांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. ₹५,००० पेक्षा अधिक रकमेवर रेव्हेन्यू स्टॅम्प लावावा व सर्व पावत्या नमुना ५ च्या दैनिक रोकडवहीत नोंदवाव्या.

नमुना ८

कर आकारणी नोंदवही

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १२४ नुसार ग्रामपंचायत हद्दीतील कर आकारणीस पात्र असलेल्या सर्व इमारती व जमिनींची नोंद या नोंदवहीत घेतली जाते.

नमुना १४

मुद्रांक हिशोब नोंदवही

नोंदवहीत खरेदी व वापर केलेल्या महसुल मुद्रांकांची नोंद घेतली जाते आणि सरपंच दर महिन्याला साठा प्रमाणित करून साक्षांकित करतात. ५ हजार रुपयांपेक्षा अधिक वसुली असल्यास महसुल मुद्रांक लावून पावती देणे ग्रामपंचायतीस बंधनकारक आहे.

नमुना २१

कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाची नोंदवही

ग्रामपंचायतीमार्फत नियुक्त केलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके या नोंदवहीत तयार करण्यात येतात. या नोंदवहीत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, देय भत्ते, लागू होणाऱ्या कपाती तसेच निव्वळ देय रकमेचा तपशील नोंदवलेला असतो. संबंधित वेतनाची रक्कम अदा करण्यासाठी सरपंचांची मंजुरी आवश्यक असते.

नमुना २२

स्थावर मालमत्ता नोंदवही

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तसेच ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेल्या सर्व स्थावर मालमत्तांची (उदा. कार्यालय, विहीर, स्मशानभूमी, दुकानगाळे, इमारती, भूमिगत गटारे इ.) नोंद या नोंदवहीत करण्यात येते.

नमुना २४

जमिनीची नोंदवही

पंचायतीने खरेदी केलेली, संपादित केलेली किंवा शासनाकडून हस्तांतरित झालेली सर्व जमीन, जागा, मोकळी जागा, पडिक जमीन, गायरान इत्यादींच्या सविस्तर नोंदी या नोंदवहीत घेतल्या जातात.

नमुना २५

गुंतवणूक नोंदवही

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता, २०११ मधील नियम १५ नुसार ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची व त्यावर मिळणाऱ्या व्याजाची सविस्तर नोंद या नोंदवहीत घेतली जाते. दर महिन्याला ही माहिती सर्वसाधारण रोकडवही (नमुना ५) शी तालमेल करून सरपंच / ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केली जाते.

नमुना ३१

प्रवास भत्ता देयक

ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांना दिलेल्या प्रवास भत्त्यांची नोंद या नोंदवहीत घेतली जाते. हा प्रवास भत्ता ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी, प्रशिक्षणासाठी, चर्चासत्रासाठी तसेच शासनाने आयोजित केलेल्या इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी प्रदान केला जातो.

नमुना ३३

वृक्ष नोंदवही

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर, रस्त्यांच्या कडेला, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच इतर ठिकाणी केलेल्या वृक्ष लागवडीची नोंद या नोंदवहीत घेतली जाते. या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद तसेच झाडे नष्ट झाल्यास किंवा तोडले असल्यास त्याची नोंद योग्य कारणासह या वहीत केली जाते.

ग्रामपंचायत मार्फत मिळणाऱ्या सेवा

अ. क्र. सेवेचे नाव कामकाजाचे दिवस पदाधिकारी प्रथम अपील प्राधिकरी द्वितीय अपील प्राधिकरी
जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
मृत्यू नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
विवाह नोंद दाखला ९ दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला ९ दिवस सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला ५ दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
नमुना ८ चा उतारा ५ दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
निराधार असल्याचा दाखला २० दिवस ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी

स्वयंघोषणापत्रे

📄 रहिवासी स्वयं घोषणापत्र
📄 शौचालय असल्याबाबत स्वयं घोषणापत्र
📄 कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचा स्वयं घोषणापत्र
📄 वीज जोडणीसाठी स्वयं घोषणापत्र
📄 वयाबाबत स्वयं घोषणापत्र
📄 परित्यक्त्या स्वयं घोषणापत्र
📄 हयात असल्याबाबत स्वयं घोषणापत्र
📄 विधवा असल्याबाबत स्वयं घोषणापत्र
📄 विभक्त कुटुंब असल्याबाबत स्वयं घोषणापत्र

ग्राम विकास व पंचायत राज विभाग मार्फत सेवा

अंतर्गत पूरक ७ प्रकारचे खरेदी ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध आहेत

क्रमांक सेवा सेवा कालावधी पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
नवीन नळ कनेक्शन १५ दिवस ग्रामसेवक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
नळ जोडणी दुरुस्ती ८ दिवस ग्रामसेवक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
घरगुती नळ जोडणी १५ दिवस ग्रामसेवक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
पथदिवा दुरुस्ती ८ दिवस ग्रामसेवक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
नवीन पथदिवा बसविणे १५ दिवस ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
कचरा साफसफाई ८ दिवस ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
मलनिस्सारण नाली दुरुस्ती ८ दिवस ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी